Ad will apear here
Next
सावंदे जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती


भिवंडी : स्त्री शिक्षणाचे बीज रोवणाऱ्या समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती तालुक्यातील सावंदे जिल्हा परिषद शाळेत साजरी करण्यात आली.

या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवन प्रवासाची माहिती देऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंवर भाषणे सादर केली. स्वराज्याची निर्मिती करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहचावा यासाठी अक्षय भोईर, स्वप्नील भोईर, रोहित जाधव या तरुणांनी एकत्र येऊन सावंदे जिल्हा परिषद शाळेत शिवाजी महाराज यांच्या विचारांबद्दल मार्गदर्शन केले आणि ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे वाटप केले.



अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा प्रधान सचिव गणेश शेलार यांनी या अंधश्रद्धेबाबत चमत्कारचे प्रयोग दाखवून त्यामागचे विज्ञान स्पष्ट केले. या कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांचे विचार एकत्रपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यात आले.

या वेळी शाळा कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे मुख्याध्यापक खंडू भोईर, मनोज गोंधळी, संतोष गाढे, हेमंत गिरी आदी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZXDBW
Similar Posts
डोंबिवलीत रंगले ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले कविसंमेलन डोंबिवली : कल्याण येथील लाखमोलाच्या कविता काव्यमंच, भिवंडीतील माझी आई प्रतिष्ठान, बहुद्देश मानवसेवा संस्था, मुंबईतील विकास प्रबोधिनी संस्था, कल्याणमधील रामवेणू काव्यमंच दिवा, कवीकट्टा आणि ठाणे येथील चैतन्य सुखदेव सोनावणे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८८ व्या
पडघा केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहात भिवंडी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या २०१५पासून सुरू केलेल्या उपक्रमांतर्गत शिक्षणात होणाऱ्या बदलांवर चिकित्सा व्हावी व शिक्षकांना योग्य माहिती मिळावी म्हणून भिवंडी तालुक्यातील पडघा शैक्षणिक केंद्राची मासिक शिक्षण परिषद पडघा-समतानगर बोरिवली जिल्हा परिषद मराठी शाळेत नुकतीच पार पाडली.
प्रा. विकास उबाळेंना अर्थशास्त्राची डॉक्टरेट भिवंडी : बीएनएन महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक विकास उबाळे यांनी अर्थशास्त्र विषयात पीएचडी प्राप्त केली.
अंजुरफाटा जिल्हा परिषद मराठी शाळेत शिवसप्ताह भिवंडी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकीक पराक्रमाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने शिवजयंतीचे औचित्य साधून भिवंडी तालुक्यातील अंजुरफाटा जिल्हा परिषद शाळेत १९ फेब्रुवारीपर्यंत शिवसप्ताह उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language